प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेत नोंदणीच्या अंतिम तारखेत वाढ! लगेच करा अर्ज PM Internship Yojana


PM Internship Yojana : केंद्र सरकार द्वारे चालू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठीच्या अंतिम तारखेत आता वाढ करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार लगेच पाठवा अर्ज. केंद्र सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी असलेल्या अंतिम तारखेत वाट करून ती 15 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. आता इच्छुक उमेदवार 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. काही कारणास्तव ज्या उमेदवाराचे अर्ज राहिले असतील त्या उमेदवारांना आता अर्ज करण्याची सुवर्णसंधी भेटली आहे.

PM Internship Yojana या योजनेची पात्रता

प्रधानमंत्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहे. उमेदवारांचं वय 21 ते 24 च्या आत असावे त्याचबरोबर उमेदवाराचा पूर्ण वेळ शिक्षण किंवा नोकरीशी संलग्नता नसावी. ऑनलाइन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेला अर्ज करू शकतात.

PM Internship Yojana अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे. त्यानंतर रजिस्टर लिंक वर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे. आणि नंतर आपला फॉर्म तपासून सबमिट करावे.

अधिकृत वेबसाईट : https://pminternship.mca.gov.in/login/

PM Internship अंतर्गत उमेदवारांना किती सहाय्य मिळेल

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंटर्न ला 12 महिन्यांसाठी 5 हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य आणि 6 हजार रुपये एक वेळ अनुदान मिळेल.

या आणि अशा अनेक भरती शी संबंधित माहितीसाठी तुम्ही भेट द्या सरकारी जॉब्सला आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत करा. पुढे येणाऱ्या सर्व भरती अपडेट साठी सरकारी जॉब ला भेट द्या आणि सरकारी जॉब व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी सरकारी जॉब्स sarkarijobs.digitalpor.in भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!