महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर l Maharashtra Typing Exam 2024


Maharashtra Typing Exam 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक वर होणाऱ्या टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. संगणक टायपिंग परीक्षा या 9 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या संगणक टायपिंग साठी राज्यभरातून लाखभर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आणि हे सर्व विद्यार्थी या परीक्षा वेळापत्रकाचे आतुरतेने वाट बघत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे या टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक टायपिंग मॅन्युअल टायपिंग व शॉर्टहँड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली होती. ही परीक्षा डिसेंबर ते जानेवारी यादरम्यान होणार आहे. संगणक टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले परंतु शॉर्टहॅन्ड परीक्षेचे वेळापत्रक आत्तापर्यंत.

Maharashtra Typing Exam 2024 परीक्षा येणाऱ्या अडचणींचा आढावा

संगणक टायपिंग, शॉर्ट परीक्षेत मागील जून मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. बऱ्याच ठिकाणी परीक्षा केंद्रावर संगणक यंत्रणा व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे तक्रारी मांडल्या होत्या. आता परिषदेने या अडचणींना लक्षात घेऊन उपाययोजना केलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक टायपिंग या परीक्षेचे आयोजन केले जाते. संपूर्ण राज्यात 300 केंद्रावर कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट संगणक टंकलेखनाची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते.

Maharashtra Typing Exam new rule

महाराष्ट्र टायपिंग परीक्षेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिषदेने जून 2024 पासून होणाऱ्या परीक्षा प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रश्नांचा क्रम बदलण्यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेमध्ये कपात केली म्हणजे 8 ऐवजी 5 मिनिटे दिली. स्पीड पॅसेज वेगात सोडवण्याचा सराव होण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 मिनिटांचा सराव उतारा म्हणजेच ट्रायल पॅसेज देण्यात आला. आता डिसेंबर मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हाच बदल असणार आहे.

या आणि अशा अनेक भरती शी संबंधित माहितीसाठी तुम्ही भेट द्या सरकारी जॉब्सला आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत करा. पुढे येणाऱ्या सर्व भरती अपडेट साठी सरकारी जॉब ला भेट द्या आणि सरकारी जॉब व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी सरकारी जॉब्स sarkarijobs.digitalpor.in भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!